भाजपच्या सभेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, फडणवीसांच्या नेतृत्वात सभा, निवडणुकीदरम्यान कोरोना होत नाही?
सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर
Updated at:
12 Apr 2021 09:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते आज मंगळवेढा आणि पंढरपुरात प्रचारसभा घेत आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. कोरोना काळात शेतकरी अडचणीत असताना या महावसुली सरकारने गेल्या दोन महिन्यात शेतकऱ्यांची वीज तोडणी करून पाच हजार कोटीची वसुली केली तर मुंबई बिल्डरांना मात्र पाच हजार कोटींची सूट दिली. कारण ते यांना मालपाणी देतात असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीसांच्या या सभांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचं चित्र होतं.