Suresh Dhas Meets Dhananjay Munde : सुरेश धस, धनंजय मुंडे भेटीने काय बदललं? Special Report
संजय राऊत जेव्हा बोलतात, तेव्हा ते कोणता नवा सनसनाटी दावा करतात.. कोणता खळबळजनक आरोप करतात याकडे सर्वांचं लक्ष असतं.
सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्याचं एबीपी माझाने पहिल्यांदा समोर आणलं होतं.
त्या भेटीनंतर संजय राऊतांच्या आरोपांना नवी धार चढली.
धसांनी संतोष देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार केला अशी टीका राऊतांनी केली.
संजय राऊतांनी थेट भाजपला आणि फडणवीसांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करत मोठमोठे आरोपही केले.
<<संजय राऊतांच्या खालच्या बाईटची थ्री विन्डो करण्याऐवजी मोन्ताज स्टाईल एडिट करा... फायर वैगेरे दाखवा, भाजपच्या नेत्यांचे व्हिज्युल्स मध्ये इन्सर्ट करा>>
((१. जरांगे यांच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी धस यांना पुढे करण्यात आलं
२. या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का ?
३. बिहार टाईप माफिया टोळीचं नेतृत्व कोण करत आहे हे सुरेश धस यांनी महाराष्ट्र आणि देशाला सांगावे. मुख्य सूत्रधार मुंडे आणि त्यांनाच रात्री भेटायला जातात मग संशय निर्माण होणारच. बीड मधल्या मिर्जापुरचा डॉन मानतात त्यांना तुम्ही रात्री गुपचूप भेटता आणि फडणवीस त्यांचा समर्थन करतात मिली भगत आहे की काय याच्यामध्ये))
व्हिओ-२
संजय राऊत यांच्या वक्तव्याला भाजपने मात्र फार महत्व दिलं नाही.. महत्व देणं दुरच भाजपच्या तीन मोठ्या नेत्यांनी राऊतांना थेट वेड्यांच्या पंक्तित बसवलंय
३ विंडो बाईट - फडणवीस+बावनकुळे+विखे पाटील
व्हिओ-३
संजय राऊतांच्या आरोपांना देशमुख कुटुंबियांकडूनही मात्र दुजोरा मिळाला. तसंच अंजली दमानिया यांनीही आपल्या आरोपांची आणि प्रश्नांची सरबत्ती कायम ठेवली
बाईट - धनंजय देशमुख + अंजली दमानिया
व्हिओ-४
या प्रकरणात सुप्रिया सुळे सुद्धा एक्टिव मोडमध्ये आल्या आहेत. मंगळवारी मस्साजोगमध्ये जाऊन त्या देशमुख कुुटुंबियांची भेट घेणार आहेत. त्यानंतर महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांचंही भेटून सांत्वन कऱणार आहेत. त्यांनी, जितेंद्र आव्हाडांनी आणि ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंनीही संजय राऊतांच्या आरोपांची पाठराखण केली
३ विंडो बाईट - अंबादास दानवे, सुप्रिया सुळे+ जितेंद्र आव्हाड
R MUM JITENDRA AWHAD PC LIVE 170225 -
((मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आंदोलन तीव्रता कमी करण्यासाठी सुरेश धस यांचा वापर झाला
सुरेश धस चांगले वक्ते आहेत त्यांना लोकांना खेळवून ठेवता येत ते समाजाला चांगल्या प्रकारे समजू शकतात
त्यामुळे त्यांचा वापर भाजपने केला... आणि नंतर धनंजय मुंडे यांची भेट घेऊन ते शत्रू झाले आणि त्यांना बाजूला केलं ))
व्हिओ-५
स्वत: अजितदादांनीच नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केल्याने राष्ट्रवादीकडून इतर कोणी बोलण्याचा प्रश्नच नव्हता मात्र
महायुतीसरकारमधील दुसरा महत्वाचा पक्ष असलेल्या शिवसेनेकडून काहीशी सावध प्रतिक्रिया पाहायला मिळाली.
बाईट - संजय शिरसाट + अजितदादा समर्थक
R SNAGAR SANJAY SHIRSAT PC LIVE 170225
व्हिओ क्लोज
सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीने अनेक समीकरणं बदलली आहेत. त्या पार्श्वभूमीवर
पुढील दिशा ठरवण्यासाठी मस्साजोगमध्ये नागरिकांची बैठक पार पडली. या प्रकरणात तपास वेगात आणि योग्य दिशेने सुरु राहणं गरजेचं आहे तसंच समाजघातक तत्व सहभागी होऊन परिस्थिती चिघळणार नाहीत याची काळजी घेण्याचं आव्हान सरकारसमोर असेल.
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा