राजकारणात Rohit Patil नावाचा नवा ब्रॅंड, 23 वर्षीय रोहितचा दिग्गजांना दणका: Special Report
कुलदीप माने, एबीपी माझा | 19 Jan 2022 11:10 PM (IST)
सांगली : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी राजकारणात दिमाखदार एन्ट्री केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पॅनेलने 10 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. विरोधी शेतकरी विकास पॅनलल 6 जागांवर समाधान मानावं लागलं. सेनापती नसताना मावळ्यांनी गड राखला हे दाखवून दिलं अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी दिली. एबीपी माझाला त्यांनी एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते.