Nagpur Crime : नागपुरात गुन्हेगारीत वाढ, वेब सीरिज, क्राईम शोज् पोलिसांसाठी ठरतायत डोकेदुखी
रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर | 04 Jul 2021 11:29 PM (IST)
नागपूर : विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिज आणि क्राईम शोज सध्या अनेकांच्या पसंतीचे ठरतायेत. मात्र, नागपुरात या वेब सीरिज आणि क्राईम शोज पोलिसांसाठी नवी डोकेदुखी ठरत आहेत. कारण नागपुरात नवखे गुन्हेगार याच वेब सीरिज आणि क्राईम शोज पाहून गुन्हे करत असल्याचे समोर आले आहे. एकट्या जून महिन्यात घडलेल्या अनेक गुन्हेगारीच्या घटनांमागे वेब सीरिज आणि क्राईम शोजचा वापर गुन्ह्याची योजना बनवण्यासाठी किंवा कट रचण्यासाठी केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.