Ratnagiri : कोकणातल्या रिफायनरीचं ठरलं? राणे म्हणतात 'ठाकरेंचं चालणार नाही' : ABP Majha
नवनाथ बन | 23 Aug 2021 09:52 PM (IST)
गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्पासाठी आता नवी जागेची राज्य सरकारकडून चाचपणी सुरू झाली आहे. जागेवरून वादग्रस्त ठरत असलेला ह्या प्रकल्पाला मंत्री नारायण राणेंनी मात्र विरोध दर्शवला आहे. केंद्रात आमचं सरकार असून उद्धव ठाकरेंचं काहीच चालणार नाही असे म्हणत राणे यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू - सोलगाव या नवीन ठिकाणी रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे यासाठी सध्या चाचपणी सुरु आहे. अगदी उद्योग मंत्रालय देखील याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे. पण, याठिकाणी देखील जमिनी खरेदी करताना स्थानिकांना अंधारात ठेवल्याचा आरोप आहे.