Pune Crime पुणे पुन्हा गँगवॉरने हादरले, अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारांची समस्या गंभीर Special Report
abp majha web team | 03 Nov 2025 10:42 PM (IST)
पुण्यातील आंदेकर-कोंकण टोळीयुद्धात (Andekar-Konkan Gang War) गणेश काळेच्या हत्येने (Ganesh Kale Murder) पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलांचा वापर झाल्याचे समोर आल्याने अल्पवयीन गुन्हेगारीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. 'गुन्हेगारांचं कंबरडं मोडण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत,' असा दावा पोलीस करत असले तरी, शहरात सुरू असलेले हे हत्याकांड थांबण्याचे नाव घेत नाहीये. या टोळीयुद्धात आतापर्यंत निखिल आखाडे, माजी नगरसेवक वनराज आंदेकर, आयुष कोंकण आणि आता गणेश काळे असे चार खून झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे प्रत्येक हत्येत अल्पवयीन किंवा नुकत्याच तारुण्यात आलेल्या मुलांचा वापर झाल्याचे उघड झाले आहे. आंदेकर टोळीचा म्होरक्या कृष्णा आंदेकर तुरुंगात असूनही त्याच्याच आदेशाने ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांच्या मोठ्या दाव्यांनंतरही गुन्हेगारी नियंत्रणात येत नसल्याने, केवळ घोषणांऐवजी ठोस कारवाईची गरज पुणेकरांकडून व्यक्त होत आहे.