Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
आता एक गंभीर आणि तितकीच हलकीफुलकी बातमी... राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु असताना घडलेल्या एका घटनेमुळे सभागृहात एकच हशा पिकलेला पाहायला मिळाला...भाजपचे आमदार प्रसाद लाड बोलण्यासाठी विधानपरिषदेत उभे राहिले तेव्हा आपल्याला २ ते ३ वेळा शॉक लागल्याची माहिती त्यांनी दिली..त्यामुळे मला काही झालं तर राज्याचं नुकसान होईल अशी मिश्किल पुष्टीही त्यांनी जोडली...यानंतर भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी तितक्याच दिलखुलासपणे प्रतिक्रिया दिली...यामुळे सभागृहात एकच हास्यकल्लोळ पाहायला मिळाला...त्यामुळे सभागृहात शॉक लागणं
सध्या नागपुरात सुरु आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. विधान परिषदेचं कामकाज सुरु असताना भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांना शॉक लागला. विधान परिषदेत बोलण्यासाठी त्यांच्या बाकावर उभे राहताच दोन-तीनवेळा शॉक लागल्याचं प्रसाद लाड यांनी सभागृहात सांगितलं. मला काही झालं तर राज्याचे नुकसान होईल, असा मिश्कील टोलाही प्रसाद लाड यांनी शॉक लागताच सभागृहात बोलावून दाखवला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.