Opposition Parties Special Report : केजरीवालांना 'पवार'फुल सपोर्ट, विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न
abp majha web team | 25 May 2023 11:32 PM (IST)
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मुंबई भेट त्यांच्या दृष्टीनं सुफळ संपूर्ण झाली, असं म्हणावं लागेल. कारण उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ शरद पवारांकडूनही राज्यसभेतल्या लढाईसाठी पाठिंबा मिळवण्यात केजरीवाल यशस्वी ठरलेयत. दिल्लीतल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भातल्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधातल्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेस केजरीवालांच्या आम आदमी पक्षाच्या पाठीशी राहिल, असं आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिलं. अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या आम आदमी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आज दुपारी शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत भेट घेतली होती.