Apex रुग्णालयातल्या काळ्या धंद्याचं पोस्टमार्टम, कोणतीही सुविधा नसणाऱ्या रुग्णालयात लाखोंचे उपचार
कुलदीप माने, एबीपी माझा
Updated at:
26 Jun 2021 12:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरुग्णांची हेळसांड करून तब्बल 87 रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका असलेल्या मिरज मधील येथील अॅपेक्कस केअर हॉस्पिटलचा संचालक डॉ. महेश जाधव सध्या पोलीस कोठडीत आहे. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा पुरेसा साठा नसतानाही कोविड रुग्णालय सुरू करून या हॉस्पिटलमध्ये तज्ञ वैद्यकीय पथक ऐवजी होमिओपॅथीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याकडून रुग्णावर उपचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आलाय. याशिवाय भरमसाट बिलांची आकारणी करून पावत्या देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे.