Shivaji Park - Azad Maidan : शिवाजी पार्क आणि आझाद मैदानावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
Shivaji Park - Azad Maidan : शिवाजी पार्क आणि आझाद मैदानावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
दसरा, विजयादशमीनिमित्त आज राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. आज राज्यात एकूण चार महत्त्वाचे दसरा मेळावे होणार आहेत. यातील दोन दसरा मेळावे हे मराठवाड्यात तर दोन दसरा मेळावे मुंबईत होणार आहेत. मुंबईत होणारे दसरा मेळावे हे शिवसेनेच्या (Shivsena) दोन्ही गटाचे आहेत. म्हणजेच या दिवशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. असे असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (RaJ Thackeray) हेदेखील दसऱ्यानिमित्त राज्यातील जनतेशी, मनसेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पॉडकास्टमध्ये नेमकं काय असणार? राज ठाकरे यांच्या पॉडकास्टला सकाळी 9 वाजता सुरवात होणार आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. दरवर्षी दसऱ्यानिमित्त होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. मात्र यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याव्यतिरिक्त राज ठाकरे यांच्या पॉडकास्टकडेही राज्याचे लक्ष असेल. लवकरच राज्यात विधानसभेची निवडणूक लागणार आहे. त्यामुळे निवडणूक तोंडावर असताना राज ठाकरे यांच्या या पॉडकास्टला विशेष महत्त्व आले आहे.