पूर ओसरल्यानंतरची महाडची दुरावस्था, सर्वत्र चिखलाचं साम्राज्य, पुरानं सर्व नेलं, खायचं प्यायचं काय?
निलेश बुधावले, एबीपी माझा | 23 Jul 2021 11:35 PM (IST)
Maharashtra Rain Update : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून कोकणातील काही शहरं आणि गावं पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सातारा आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी दरडी कोसळून 10 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.