Wangani : अंध महिलेच्या मदतीला मयूरची धाव, चिमुकल्याला सात सेकंदात रेल्वेखाली येण्यापासून वाचवलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Apr 2021 12:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमध्य रेल्वेवर असलेल्या वांगणी स्टेशनवर आपल्या जीवाची पर्वा न करता ट्रॅकवर पडलेल्या लहानग्याचा जीव वाचवणाऱ्या रेल्वे पॉईंटमन मयुर शेळकेचा सर्वत्र कौतुक केलं जातंय. रेल्वे मंत्री पियुष गोयल सोबतच सेंट्रल रेल्वे डीआरएम अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा मयुरच्या या धाडसाचं कौतुक केलं. शनिवारी वांगणी स्टेशन प्लॅटफॉर्मवर चालत जाणाऱ्या एका अंध महिलेच्या सोबत असलेले लहान मुलं चालत असताना अचानक प्लॅटफॉर्महून खाली पडले. त्याचवेळी त्या ट्रॅकवर येणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेकडे पाहून प्रसंगावधान दाखवून अवघ्या 7 सेकंदात त्या मुलाचा जीव मयुर शेळकेने वाचवला. हा अंगावर शहारे आणणाऱ्या कौतुकास्पद प्रसंगबाबत मयुर शेळके यांनी एबीपी माझाही बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.