PM Modi Sharad Pawar : संस्कृतीचं दर्शन की, राजकीय मिशन? Rajkiya Sholay Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्राच्या राजकारणात मंत्र्यांच्या राजीनाम्यावर वाद पेटलाय...पण तिकडे दिल्लीत मात्र दोन दिग्गज विरोधक एकाच मंचावर आले...निमित्त होतं...अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं...आणि मंचावर होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार...आता राजकारणातले तेल लावलेले हे दोन पैलवान एकत्र आल्यावर चर्चा तर होणारच...पण चर्चा वादाची नाही झाली तर चर्चा झाली ती मोदींनी पवारांना दिलेल्या ट्रिटमेंटची...पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट...
लोकसभा निवडणुकीत मोदींच्या याच वक्तव्यानं वादाचा भडका उडाला होता...
महाराष्ट्रात येऊन मोदींनी पवारांना भटकती आत्मा म्हटलं...
महाराष्ट्रातल्या अनेकांना ही टीका रुचली नाही...
खुद्द अजित पवारांनीही याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली...
त्यापासून धडा घेतलेल्या मोदींनी लोकसभेत पवारांबद्दल चकार शब्दही काढला नाही...
निवडणुकीतल्या कुरुक्षेत्रानंतर मोदी आणि पवारांची गाठ पडली
ती दिल्लीतल्या सारस्वतांच्या मेळाव्याच्या व्य़ासपीठावर...
व्यासपीठ जरी मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचं असलं तरी
चर्चा झाली ती मोदी आणि पवारांची...