India vs Pakistan Special Report : भारताचा धाक, बेचिराख पाक; पाकिस्तानचं नेमकं किती नुकसान झालं?

India vs Pakistan Special Report : भारताचा धाक, बेचिराख पाक; पाकिस्तानचं नेमकं किती नुकसान झालं?

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून (Operation Sindoor) भारतीय हवाईदलाने 7 मे रोजी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना गाडल्यानंतर, 9 आणि 10 मे रोजी ब्राह्मोस आणि स्काल्प क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने  पाकिस्तानच्या 11 हवाई तळांवर हल्ले करून त्यांचं कंबरडं मोडलं. भारताच्या या कारवाईची पाकिस्ताननेही कबुली दिली. भारताच्या या ऑपरेशन सिंदूरचे आता सॅटेलाईट फोटोही समोर आले आहेत.

पाकिस्तानी हवाई दलासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या सरगोधा हवाईतळाला सर्वात आधी भारतीय हवाईदलाने निशाण्यावर घेतलं. लाहोरच्या पश्चिमेस आणि पंजाब सीमेपासून अवघ्या दोनशे किलोमीटर अंतरावरील या हवाईतळावरी दोन्ही धावपट्यांवर बॉम्ब टाकण्यात आले. 

आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या दोनशे किलोमीटर अंतरावरील, पाकिस्तानच्या जाकोबाबाद हवाई तळाला भारताने टार्गेट केलं. या हवाई तळावरील हँगर भारतीय हवाईदलाने उद्ध्वस्त केलं. या ठिकाणी विमानांची दुरुस्ती आणि देखभाल केली जात होती.

यापाठोपाठ भारताने आपला मोर्चा वळवला तो 2017 पासून कार्यरत झालेल्या जामशोरो येथील भोलारी हवाईतळाकडे. भारतीय हवाई दलाने हवाई हल्ला करत या तळावरील हँगरला लक्ष्य केले. यात मोठे नुकसान झाल्याचे सॅटेलाईट फोटोतून दिसते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola