Pegasus Spying : पेगससचा वापर करून पाळत ठेवल्याचा दावा,अमित शाहांनी राजीनामा द्यावा,काँग्रेसची मागणी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली: इस्त्रायलच्या एनएसओ या फर्मवेअरने तयार केलेलं पेगॅसस स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जगभरातील दहा देशांच्या सरकारांनी या स्पायवेअरचा वापर करुन आपल्याच देशाच्या पत्रकार आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन हॅक केले आणि हेरगिरी केला असल्याचा आरोप अॅमनेस्टी इंटरनॅशनलने केला आहे. ब्रिटनमधील वृत्तपत्र द गार्जियननं एक रिपोर्ट केला आहे. त्यात असा आरोप केला आहे की, पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार, वकिलांसह काही महत्वाच्या व्यक्तिंची हेरगिरी केली जात आहे. यात भारताचाही समावेश असून भारतातील 40 हून अधिक पत्रकार, तीन विरोधी पक्षातील नेते, सरकारमधील दोन मंत्री, सुरक्षा एजन्सीमधील अधिकारी आणि काही उद्योजकांचा समावेश आहे.
भारत सरकारनं गार्जियनच्या दावा फेटाळला, म्हणाले, सर्वांची प्रायव्हसी सुरक्षित
गार्जियननं दावा केल्यानंतर भारत सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. भारत सरकारकडून सांगण्यात आलं आहे की, भारतात एक मजबूत लोकशाही आहे. इथं खाजगी आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा सन्मान केला जातो. भारतात पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा लागू आहे, त्याअंतर्गत सर्वांची प्रायव्हसी सुरक्षित आहे. सरकारनं म्हटलं आहे की, गार्जियनच्या स्टोरीमध्ये पुराव्याशिवाय निष्कर्ष काढले गेले आहेत.