Patna Meeting Poster Special Report : बैठक एक, पोस्टर्स अनेक, तीनवेळा बदललं विरोधकांचं पोस्टर्स
abp majha web team | 23 Jun 2023 11:01 PM (IST)

पाटण्यात विरोधकांची बैठक पार पडली... मात्र चर्चा झाली ती जेडीयूच्या एका ट्वीटची.. दुपारी बैठक सुरु झाली तेव्हा जनता दल युनायटेड पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्वीट आलं.. काही मिनिटांमध्येच ते ट्विट काढण्यात आलं.. पुन्हा तशाच आशयाचं आणखी एक ट्विट आलं.. यावेळी मात्र, ट्विटमधला फोटो बदलला होता.. त्याच ट्विटला काही मिनिटं होत नाही तोवर आणखी एक ट्विट आलं.. आणि विरोधकांच्या एकजूटीवर टीका सुरु झाली... पाहुयात काय होतं त्या ट्वीटमध्ये...