Special Report : दुष्काळी मंगळवेढ्यात खिलार खोंडाला मिळाले 6 लाख 11 हजार रुपये : ABP Majha
सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर
Updated at:
02 Aug 2021 09:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंढरपूर : शेतीच्या मशागतीची कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने सुरु असताना रोज डिझेलचे दर वाढू लागल्याने आता शेतकरी पुन्हा पशुधनाकडे वाळू लागला असून मंगळवेढा तालुक्यातील हिवरगाव येथील शेतकऱ्याच्या खिलार खोंडाला तब्बल 6 लाख अकरा हजार रुपयाची किंमत मिळाली आहे. मंगळवेढा हा तास दुष्काळी पट्टा, पावसावर येणाऱ्या ज्वारी पिकाचा त्याला काय तो आधार यामुळेच अलीकडच्या काळात या भागातील शेतकरी खिलार जनावरांच्या संगोपनाकडे वळू लागला . पंढरपूर , सांगोला , मंगळवेढा या भागात खिलारची पैदास मोठा प्रमाणात असल्याने येथे खिलार खोंडांचे संगोपन करून त्याच्या विक्रीचा जोडधंदा शेतकऱ्यांच्या संसाराला चांगलाच आधार देऊ लागला आहे.