Pachora Election Special Report : पाचोऱ्यात किशोर पाटील- वैशाली सूर्यवंशी आमने - सामने
abp majha web team | 24 Apr 2023 11:34 PM (IST)

राज्याच्या राजकारणात काका पुतण्याचं नातं सर्वश्रुत आहे. त्यातून झालेली राजकीय बंडखोरीही महाराष्ट्राने बघितली. त्या पाठोपाठ भावा बहिणीच्या नात्यातली राजकीय कटुतेपासूनही महाराष्ट्र अनभिज्ञ नाहीये. यात आणखी एक भर पडली आहे ती पाचोराचे आमदार किशोर पाटील आणि वैशाली सूर्यवंशी यांची.. आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात खरी लढाई ही या भावा बहिणीमध्येच होणार आहे. पण असं असलं तरी याच संघर्षातून आर.ओ.पाटलांचा राजकीय वारसदार कोण यावरही यातून शिक्कामोर्तब होणार आहे