Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?
Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?
महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीकडून संपर्क करणं आम्हाला सुरू आहे. मात्र अद्याप आम्ही निर्णय घेतलेला नाही. एकदा राज्याच्या निकालाचे कल हातात आला की आम्ही निर्णय घेऊ. अशी स्पष्टोक्ती परिवर्तन महाशक्तीचे (Parivartan Mahashakti) घटक असलेले आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना दिली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती सोबत येण्यासंदर्भात बच्चू कडूंना फोन आल्याची माहिती पुढे आली आहे. यावर बोलताना बच्चू कडूंनी भाष्य केलंय.
पाठिंबा देण्यापेक्षा आम्ही आमचं सरकार आणण्यासाठी प्रयत्नशील- बच्चू कडू
राज्यात उद्या येणाऱ्या निवडणुकांच्या निकालासंदर्भात महायुती, महाविकास आघाडी ज्याप्रमाणे संपर्क करत आहे, तसं आम्ही देखील संपर्क करतोय. माझ्या पक्षाचे 4 ते 5 उमेदवार निवडून येतील. आम्ही जी तिसरी आघाडी केली त्याचे मिळून एकूण 10 ते 15 उमेदवार निवडून येतील. त्यामुळे सध्या कार्यकर्ते उत्साही आहेत. भावी मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लावत आहेत. मात्र वस्तुस्थिती वेगळी असू शकेल. माझा एक्झिट पोलवर विश्वास नाही. त्यासाठी उद्याची वाट बघावी लागेल. दरम्यान, कुणाला पाठिंबा देण्यापेक्षा आम्ही आमचं सरकार आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. असेही बच्चू कडू म्हणाले.