Old Man riding Bullock Cart : 75 वर्षीय नानांचा नाद खुळा, शर्यतीत बैलजोडीच्या पुढे घोडीवर बसून धुरळा
नाजीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड
Updated at:
14 Feb 2022 11:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBullock Cart Race : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवल्यानंतर आता राज्यभरात विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जात आहे. नुकतेच पुण्यातील मावळ तालुक्यात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत बैलगाड्यांपेक्षा जास्त लक्ष वेधून घेतले 75 वर्षीय मधू नाना पाचपुते यांनी. पाचपुते यांनी बैलगाडा शर्यतीचा घाट गाजवलाय. अगदी तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह आणि शैली आहे. त्यामुळेच राज्यातील बैलगाडा शौकीन त्यांचे जणू फॅन झाले आहेत. पाचपुते यांनी शर्यतीत बैलगाड्यांपुढं पळवलेली घोडी पाहण्यासाठी परिसरातून शौकीन गर्दी करत असतात. घोडी पळवताना त्यांचा उत्साह पाहण्यासारखाच असतो.