Rane VS Rane : भाऊ घरी, निवडणुकीत राजकीय वैरी, नितेश राणेंचा निलेशसाठी सावधगिरीचा इशारा Special Report
गेल्या दोन तीन आठवडे संपूर्ण महाराष्ट्रानं राणे विरूद्ध राणे असा सामना पाहिला... राणे बंधूंमधल्या या लढाईवर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलीय.. मात्र या प्रतिक्रियेतच राणे विरूद्ध राणेंमधल्या राजकीय वैमनस्याचं सार दडलंय... हा सामना फक्त दोन भावांमधला आहे की या दोन भावांच्या आड दोन वेगळ्याच शक्ती एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करताहेत? पाहुयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट
आजवर सिंधुदुर्गानं अनेक निवडणुकांमध्ये सिनिअर आणि ज्युनिअर राणेंचे वेगवेगळे अवतार , त्यांचे जय-पराजय पाहिलेत...
मात्र यावेळी पहिल्यांदाच राणे विरूद्ध राणे, अशी निवडणूक पाहायला मिळत असल्यानं, त्याकडे फक्त सिंधुदुर्गाचंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय..
नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी, सिंधुदुर्गात युतीमध्ये मिठाचा खडा पडला...
शिंदेंच्या शिवसेनेचे निलेश राणे आणि भाजपचे नितेश राणे...
सख्ख्या भावंडांमध्ये सामना सुरू झाला
निलेश राणेंनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात स्टिंग ऑपरेशन केलं...
त्यामुळे प्रकरण फक्त दोन राणेंपुरतं उरलं नाही
महायुतीच्या बड्या नेत्यांना यात उडी घ्यावी लागली..
निवडणुकीच्या आधीच्या अखरेच्या रात्रीपर्यंत
हा राजकीय शिमगा शमायचं काही नाव घेत नाहीय...
आपल्या भावाला म्हणजे निलेश राणेंना शिंदेंच्या शिवसेनेत एकटं पाडलं जात असल्याचा नितेश राणेंचा दावा आहे..
तर भावाच्या सल्ल्याला केराची टोपली दाखवत निलेश राणेंनी भाजपवरची आगपाखड कायम ठेवलीय
तसेच गुन्हे भाजपच्या लोकांवर आहेत मात्र त्यांच्यावर कारवाई नाही
हा सत्तेचा दुरूपयोग आहे
माझ्यामागे हेर ठेवणं, फोन टॅप होत असतील..हे सगळं सुरू आहे
जर रावणाचा अहंकार तुटू शकतो तर कुणाचाही तुटू शकतो
ती वेळ आली आहे))
भाजपच्या प्रचारासाठी कोकणात आलेल्या आशिष शेलारांनी निलेश राणेंवर प्रहार केला...
निलेश राणेंनी शेलारांना मोठ्या भावाची उपमा दिली... मात्र मोठ्या भावाला प्रत्युत्तर द्यायला ते विसरले नाहीत
रवींद्र चव्हाण यांच्यावर केलेले खोटे आरोप भाजप सहन करणार नाही.
निवडणुका येतील जातील, सूर्यावर थुंकण्याचा जो प्रयत्न करेल, थुंकी त्यांच्या तोंडावर उडेल,
एक वकील म्हणून सांगतोय
शिल्पा खोत यांच्या जात प्रमाणपत्रावर बोलता निवडणुकीत उभे आहात मग समोरासमोर या, रडीचा डाव कसला टाकता. वकील म्हणून सभागृहाचा सदस्य आणि देवेंद्र फडणवीस यांचा कॅबिनेटचा सहकारी म्हणून सांगतोय, कोणाचा मायकालाल या प्रमाणपत्रावर प्रश्न उपस्थित करू शकत नाही.
राणे बंधूंमधल्या सामन्यावर आजवर सगळे बडे नेते बोलून झालेत...
बाकी राहिले होते ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
अखेर त्यांनी देखील भावना व्यक्त केल्याच..
देवेंद्र फडणवीस - राणे वि राणे असं होणं योग्य नाही....मी बरोबर असलेल्या बाजूने आहे... शिंदेंनी निलेश राणेंची पाठराखण केली असेल..मी मात्र जो योग्य आहे त्याच्याच बाजूने आहे.. दोघांच्याही बाजूने मी असेनच))
थोडक्यात काय तर खरा राजकीय संघर्ष राणे बंधूंमध्ये नाही तर भाजप आणि शिवसेनेत आहे...
दोन्ही भाऊ फक्त आपआपल्या पक्षाप्रती निष्ठा बाळगण्याचं काम इमानेइतबारे करताहेत..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर अशी टिपण्णी करणं चुकीचं ठरणार नाही...
मात्र राणे विरूद्ध राणे नाट्यामुळे, राजकारणात जास्त रस असणाऱ्या कोकणवासीयांचं गेले दोन तीन आठवडे चांगलं मनोरंजन झालं, एवढं नक्की
सदाशिव लाडसह अमोल मोरे एबीपी माझा सिंधुदुर्ग