'पाकिस्तानच्या नदीमविषयी अपप्रचार थांबवा', ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या Neeraj Chopra ची विनंती
एबीपी माझा वेब टीम | 26 Aug 2021 11:29 PM (IST)
टोकियो ऑलिम्पिकच्या फायनलमधल्या पहिल्या थ्रोसाठी नीरज चोप्रा जेव्हा स्वत:चा भाला शोधत होता. त्या वेळी त्याला त्याचा भाला पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या हातात असल्याचं आढळून आलं. आपण तो नदीमकडून मागून घेतल्याचं नीरज चोप्रानं नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं होतं. पण नीरजच्या त्या उद्गारांचा काही माध्यमांनी चुकीचा अर्थ घेतल्यानं तो नाराज झाला आहे. टोकियो ऑलिम्पिकमधल्या त्या घटनेचा अपप्रचारासाठी वापर करण्याचं थांबवण्याची विनंतीही त्यानं केली आहे. पाहूयात त्यानं सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये काय म्हटलं आहे.