Gadchiroli : लग्न नको म्हणून नक्षलवादी तरुणीचं आत्मसमर्पण, प्रेमाच्या ताकदीपुढे बंदुकीची ताकद हरली
रोमित तोंबर्लावार, एबीपी माझा
Updated at:
20 Jun 2021 07:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगडचिरोली : प्रेमाची ताकत खुप जास्त असते. याचं उदाहरण म्हणजे सविता नरोटी. अवघ्या 20 वर्षांची तरुणी, पण तिच्यात आणि सामान्य तरुणींच्या आयुष्यात खुप फरक आहे. वयाच्या अगदी कोवळ्या वयात म्हणजे 13 वर्षांची असताना सविता माओवादी दलममध्ये शामिल होऊन, खांद्यावर बंदूक घेऊन जंगलात वास्तव्य करायला लागली. त्यासाठी तिने घरही सोडलं होतं. पण ती आता मुख्य प्रवाहात परतली आहे, तेही फक्त प्रेमासाठी!