ABP Majha Headlines : 6:30 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

 ABP Majha Headlines :  6:30 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

 

 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती. दरम्यान, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात आज (दि.4) मोठा गोंधळ पाहायला मिळाला. कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार मधुरिमाराजे यांनी आज अखेरच्या क्षणी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. यापूर्वीच राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करुन काँग्रेसने मधुरिमाराजे यांना मैदानात उतरवले होते. दरम्यान, मधुरिमाराजे यांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर माजी मंत्री सतेज पाटील यांच्यावर मोठी नामुष्की आलेली पाहायाला मिळाली. 

मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेतला, त्यावेळी शाहू महाराज तेथे हजर होते. शाहू महाराजांनी मालोजीराजे यांच्या समोर उमेदवारी अर्ज मागे घ्या, अशा सूचना मधुरिमाराजे यांना दिल्या होत्या. दरम्यान, मधुरिमा राजे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर सतेज पाटील आणि शाहू महाराज यांच्यामध्ये झालेला संवाद व्हायरल झाला होता. "तुम्ही अगोदरच उभा राहणार नाही, असं सांगायला पाहिजे होतं. माझी फसवणूक केल्यासारखं आहे. पूर्णपणे फसवणूक केल्यासारखं आहे. मग आधीच तुम्ही निर्णय घ्यायला हवा होता. आम्हाला काहीच अडचण नव्हती. महाराज हे चुकीचे आहे. मला मान्य नाही", असं सतेज पाटील शाहू महाराजांना म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram