Nawab Malik : मलिक 'कॅप्टन' महायुतीत टशन; राष्ट्रवादीचे लाडके, भाजपचे दोडके Special Report
Nawab Malik : मलिक 'कॅप्टन' महायुतीत टशन; राष्ट्रवादीचे लाडके, भाजपचे दोडके Special Report
खटके फक्त भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्येच उडत नाहीएत... तर मुंबईमध्ये भाजपचं अजितदादांच्या राष्ट्रवादीशीही बिनसलंय... आणि त्यासाठी कारण ठरलेत नवाब मलिक... मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप निश्चिती झालेले नवाब मलिक आम्हाला नकोत असं भाजपनं स्पष्ट केलंय.. तर अजून आरोप सिद्ध कुठे झालेत? अशी क्रॉस फायरिंग करत राष्ट्रवादी काँग्रेस नवाब मलिकांची पाठराखण करतेय...
नवाब मलिक उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी विश्वासू नेता... मात्र भाजपसाठी, मनी लाँड्रिंग प्रकरणातले आरोपी ------------------- नवाब मलिक शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांचा हात पकडणारा नेता तर भाजपासाठी अंडरवर्ल्ड आणि दाऊदच्या कुटुंबाशी संबंध असलेला चेहरा ----------------------- नवाब मलिक विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून तिकीट मिळालेले उमेदवार तर भाजपसाठी महायुतीच्या उमेदवाराचे प्रतिस्पर्धी ------------------- नवाब मलिक राष्ट्रवादीचा प्रचंड विश्वास तर भाजपचा पराकोटीचा विरोध राष्ट्रवादीसाठी नवाब मलिक कोण आहेत आणि भाजपच्या लेखी कोण आहेत? याची यादी करायला गेलो तर परस्परविरोधी मुद्द्यांची भलीमोठी यादी तयार होईल...