Navneet Rana : नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाकडून रद्द,दोन लाखांचा दंड, खासदारकी धोक्यात!
प्रणय निर्बाण, एबीपी माझा
Updated at:
08 Jun 2021 11:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध ठरवत येत्या सहा आठवड्यात त्यांनी सर्व प्रमाणपत्रे जमा करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा यांनी म्हटलं की, याप्रकरणी आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू, तिथे न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.