Nashik : नाशकात मानव-बिबट्या सहजीवन जागृती केंद्र, निफाडमधील 1 हेक्टर परिसरात वन उद्यान
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा | 18 Oct 2021 11:34 PM (IST)
लोकसंख्या वाढायला लागली तसा माणसाचा जंगलातला शिरकाव वाढला. मानव आणि वन्यजीव यांच्यात अस्तित्वासाठी संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागानं पुढाकार घेतलाय. नाशकात बिबट्यांसोबतच्या सहजीवनासाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आलंय.