Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली

Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली

ठाकरेंच्या दोन नगरसेवकांवर कारवाई होणार

शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांची भेट घेतली आहे. शरद पाटील यांच्या कार्यालयात येऊन भेट घेत आशीर्वाद घेण्यासाठी ही भेट झाल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. तसेच नगरसेवक मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे हे ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहितीही महेश गायकवाड यांनी दिली आहे. तर, महेश गायकवाड यांच्या भेटीबद्दल बोलताना ही कौटुंबिक भेट असल्याचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी सांगितले. तसेच, मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे हे नगरसेवक नॉट रिचेबल आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ  पातळीवरून देण्यात आले आहेत. पुढील दोन ते तीन तासात या दोन नगरसेवकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शरद पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. त्यासाठी, शरद पाटील कोकण भवनाकडे रवाना झाले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola