Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे ८ उमेदवार निवडून आले आहेत. पण या ८ पैकी एका उमेदवाराची चर्चा जोरदार सुरू आहे. गोवंडी मधील रहिवाशी आणि पेश्याने मास्तर (शिकवणी) घेणारे असा परिचय असणारे प्रभाग क्रमांक १४० मधून विजयाचा झेंडा उंचाविणारे विजय उबाळे आहेत. AIMIM या पक्षाकडे एका विशिष्ट समाजाचे नेतृत्व केले जाते अश्याने बघितले जाते पण या पक्षातून विजय उबाळे हे हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याची चर्चा आहे… प्रभाग क्रमांक १४० हा अनुसूचित जाती साठी आरक्षित वार्ड त्यातून थेट १६ उमेदवारांचा पराभव करून विजय उभाळे यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) या पक्षतून विजयाची पताका उंचावली आहे… त्यांच्यासोबत बातचीत केली आहे प्रतिनिधी अजय माने यांनी
विजय उबाळे
१४० प्रभाग आहे मुस्लिम आणि बुद्धिस्ट आणि हिंदू अशी बरोबर ची संख्या आहे… अतिक सर आहेत ना त्यांनी यूपीएससी चे परीक्षा दोन वेळा दिली आहे… बाबासाहेब म्हणतात की राजकारणात चांगली लोक नाही गेली तर वाईट लोक डोक्यावर बसतील आणि तेच सांगत मला त्यांनी पाटबळ दिले आहे…
माझ्या सोबत सगळे इमानदार लोक आहेत त्यांच्यासोबत का नाही राह्याचे त्यांच्या पाठीशी उभे राहत असताना मला पुढे केले आहे हे मला कळले नाही
मुस्लिमीन नाव आहे म्हणून लोकांना वाटत आहे की एक समुदायाची पार्टी आहे पण असे काय नाही आहे या पक्षात हिंदू शीख सगळे आहे पूजा वंदना करणारे सगळे लोक आहे सेक्युलर पक्ष आहे सर्व समुदायाची लोक आहे…
मी हैदराबाद ला ही गेलो आहे पंचतरंकित होटल सारखे तिथे हॉस्पिटल आहे
ओवैसी संविधानासाठी काम करत आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्या पक्षात आहे संविधासाठी…
१६०० चा लीड आहे मला ४९४५ मते आहे, अतिक सरांमुळे माझ्यावर नागरिकांचा विश्वास आहे ते शिक्षक आहे आणि एक शिक्षक काय करू शकतो त्यासोबत विद्यार्थी त्यांचे पालक आणि येथील नागरिकांनी पाटबळ दिले
याआधी इथे नगरसेवकांनी काम केले नाही टक्केवारी सुरू होते.. आम्हाला ही टक्के वारी बंद करायची आहे
मारणाऱ्याची काटी पकडू शकतो बोलणारायचे तोंड नाही जर AIMIM निवडून आले नसते तर बोलले असते मत खाल्ली आता निवडून आले तर हिंदू मुस्लिम करत आहे
ओवैसी साहेब कोणत्याही भाषणात हिंदू विरोधी कधी बोलले नाही त्यांना बोललेल्यांना त्यांनी उत्तर दिले आहे ते कधीच कोणावर टीका केली नाही त्यांनी एक्शन ला रिएक्शन केले आहे mim च्या कोणत्या ही लिडरने हिंदू विरोधात बोलले नाही
आम्ही निवडणुकीआधी जाहीरनामा सादर केला आहे १५ मुद्दे आणि त्यात साबटॉपिक होते
महानगर पालिकेचा जाहीरनामा आमचा रोड मॅप ठरला आहे आम्ही स्वत ठरविले नाही कारण हे करताना वकील शिक्षक डॉक्टर इंजिनिअर आहे
आम्हाला या सर्वांसाठी काम करावे लागणार आहे जर आम्ही इथल्या प्रभागासाठी काम केले नाही तर लोक नाराज होतील आम्हाला त्यांना नाराज नाही करायचे आहे.