Sanitation Workers Morcha : सफाई कर्मचाऱ्यांचा एल्गार, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन Special Report
abp majha web team Updated at: 10 Oct 2025 10:26 PM (IST)
मुंबई महानगरपालिकेतील (BMC) सफाई कर्मचाऱ्यांनी (Sanitation Workers) वेतनवाढ, कामाचे स्थैर्य आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी थेट एबीपी माझाच्या (ABP Majha) कार्यालयात निवेदन देऊन आपली व्यथा मांडली. 'आजच्या तारखेला झालेल्या करारानुसार आम्ही कायम कामगार आहोत, पण पालिका आम्हाला कोणताही फायदा द्यायला तयार नाही,' असा थेट आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. २८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. कामगार कायद्याचे फायदे टाळण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना 'कंत्राटी' ऐवजी 'वॉलंटियर्स' (Volunteers) म्हणत असल्याचा गंभीर आरोपही संघटनेने केला आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.