Ayodhya Dhwaj :पंतप्रधान मोदी, सरसंघचालकांच्या हस्ते ध्वजरोहण राममंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाचा साज
अयोध्येमध्ये आज आणखी एक देखणा सोहळा रंगला, तो होता नव्याने उभारलेल्या भव्य राम मंदिराच्या कळसावर धर्म ध्वज फडकवण्याचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते निश्चित मुहूर्तावर हा भगवा ध्वज शिखरावर चढला. या सोहळ्यामध्ये पंतप्रधान पुन्हा एकदा भाऊक झालेले दिसले. बघूया अयोध्येतून माजी सहकारी ज्ञानदा कदमचा हा स्पेशल रिपोर्ट. आणि त्या अयोध्येत उभं राहिलेलं प्रभू श्रीरामांच हे भव्य मंदिर गेल्या वर्षी या मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि आज याच मंदिरावर धर्मध्वजा फडकली. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण केलं. सकाळी 11:50 एक मोठा प्रतीक आहे. हे मंदिर साकारण्यासाठी, हे मंदिर साकार होण्यासाठी कित्येकांनी संघर्ष केला, बलिदान दिलं, पण आता या राम मंदिराच काम पूर्ण झाल्यावरती, त्यावरही धर्मध्वजा डवलान फडकल्यावरती खऱ्या अर्थान अयोध्येमध्ये रामराज्य सुरू झाल्याची भावना ही प्रत्येक रामभक्ताच्या मनामध्ये दाटून येते. अयोध्ये मधन कॅमेरामन प्रशांत माने सह मी ज्ञानदा कदम, एबीपी माझा साठी. एबीपी माझा.