Kunal Kamra Special Report : कुणाल कामराच्या पोस्टवरून वाद टीशर्टवरील फोटोवरून भाजप नेत्यांची टीका
Kunal Kamra Special Report : कुणाल कामराच्या पोस्टवरून वाद टीशर्टवरील फोटोवरून भाजप नेत्यांची टीका
कुठला विनोद चांगला आणि कुठला वाईट याविषयी प्रत्येकाची वेगवेगळी मत असतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे संपतं आणि स्वैराचार कुठे सुरू होतो याच्या सीमा रेषेबाबतही वाद असतो. याच वादाच्या सीमारेषेवर सध्या आणखी एक वाद रंगलाय. विषय आहे कॉमेडियन कुणाल कामराच्या एका पोस्टचा. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर कामराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हिणवणारी एक पोस्ट केली आणि राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली. नेमक काय घडलं पाहूया या रिपोर्टमध्ये. संघाच्या या प्रवासात अशा पद्धतीने टीका करणाऱ्याला जनतेने वेळोवेळी उत्तर दिले. कुणाल कामराणी अतिशय खालच्या पातळीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. कुणाल कामरा सारख्या लोकांना निश्चितपणे त्यांची जागा दाखवण्याचे काम संघाचे स्वयंसेवक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करतील. असे जर आक्षेपाले पोस्ट टाकले असतील पोलीस कारवाई करतील आम्ही त्यांना पोलिसांना देऊ. असे जर आक्षेपाहे पोस्ट टाकले असतील पोलीस कारवाई करतील आम्ही त्यांना पोलीस. आणि संयम ढळला तर मग कामराचे जे काय व्हायचं ते होईल. कुणाल कामराच्या नव्या पोस्टमुळे त्याच्या जुन्या वादग्रस्त गाण्याची आठवण सर्वांना झाली. आठ महिन्यांपूर्वी मार्च महिन्यात कुणाल कामरान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून मात्र त्यांच्या नावाचा उल्लेख न करता एक गाणं रिलीज केला होता. ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी.