Mumbai Local Masjid Bander : दोषींना वाचवण्यासाठी निष्पापांचा बळी Special Report
abp majha web team | 06 Nov 2025 10:26 PM (IST)
मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या अचानक आंदोलनामुळे सामान्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. मुंब्रा येथे झालेल्या अपघातानंतर दोन अभियंत्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. 'मुंब्रेमध्ये जो अपघात झाला, त्यामध्ये पाच जणांना प्राण गमवावे लागले आणि त्यानंतर दोषी असलेल्या दोन अभियंत्यांवर गुन्हे दाखल केले आणि याचा रोष म्हणून रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आंदोलन केलं', या कारवाईमुळे कर्मचारी संतप्त झाले. या आंदोलनामुळे सीएसएमटी स्थानकातून संध्याकाळी ५ वाजून ५० मिनिटांपासून लोकल सेवा विस्कळीत झाली, ज्यामुळे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. गर्दी टाळण्यासाठी काही प्रवाशांनी रेल्वे रुळावरून चालत जाण्याचा निर्णय घेतला, मात्र सँडहर्स्ट रोडजवळ लोकलच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या आणि आंदोलकांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.