Mumbai Dabbewala Special Report :कोरोनानंतर डब्बेवाल्यांवर संकटाचे ढग, फूड ॲप जोरात डब्बेवाले संकटात
abp majha web team
Updated at:
29 Jul 2023 09:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही वर्षांपूर्वी आलेला इरफान खानचा 'द लंचबॉक्स' हा सिनेमा आपल्याला आठवत असेल.. या सिनेमात महत्त्वाची भूमिका होती ती मुंबईच्या डबेवाल्यांची.. या सिनेमात डबेलवाल्यांच्या माध्यमातून एक वेगळीच कहाणी अनुभवता आली.. सोबतच मुंबईच्या डबेवाल्यांचं महत्त्वही यातून पुन्हा एकदा अधोरेखीत झालंय. मुंबईत येणारी नैसर्गिक आपत्ती असो, वा दहशतवादी हल्ले असो कितीही मोठं संकट आलं तरी डबेवाल्यांच्या सायकलचं चाक कधी थांबलं नाही.. पण कोरोना आला आणि डबेवाल्यांच्या सेवेला लॉकडाऊन लागला.. १३० वर्ष जूना डबेवाल्यांचा उद्योग आता डबघाईला आलाय.. इतरांना खावू घालणाऱ्या डबेवाल्यांवर कशी उपासमारीची वेळ आलीये पाहूया