Mumbai Cruise Drug Case : आरोपींना ताब्यात घेताना भाजप कार्यकर्ते कसे? Special Report
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Oct 2021 10:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Cruise Drugs Case: मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. ही कारवाई बनावट असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबी कार्यालयात घेऊन जाणाऱ्या व्यक्ती भाजप कार्यकर्ते मनिष भानुशाली आणि के. पी गोसावी असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. या खळबळजनक आरोपानंतर एनसीबीने पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.