Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?
बदलापूर येथील शाळेतील लैंगिक शोषण प्रकरणातील (Badlapur School Crime News) आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याच्या पोलीस एन्काऊंटर प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज सादर करण्यात आलेल्या न्यायालयीन चौकशी समितीचा अहवालातून या प्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदेंचा पोलिसांनी केलेला एन्काऊंटरचा दावा हा संशयास्पद असल्याचे तपासात पुढे आले आहे. किंबहुना अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला सर्वस्वी पोलीसच जबाबदार असल्याचेही यातून पुढे आले आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज सादर करण्यात आलेल्या न्यायालयीन चौकशी समितीचा अहवालाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी न्यायालयात वाचन केले. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला असून यातील पाच प्रमुख मुद्दे काय हे समजून घेऊ.
चौकशी अहवालातील 5 मोठे मुद्दे!
1) बदलापूर येथील शाळेतील लैंगिक शोषण प्रकरणातील (Badlapur School Crime News) आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याच्या मृत्यूला 5 पोलीस अधिकारीच जबाबदार आहेत.
2) बंदुकीवर अक्षयच्या हाथाचे ठसे नाहीत, अक्षयच्या पायावर गोळी न झाडता, डोक्यात गोळी का घातली?
3) स्वरंक्षणासाठी एन्काऊंटर केला हा पोलिसांचा दावा संशयास्पद.
4) एन्काऊंटर फेक आहे हा अक्षय शिंदेंच्या आई-वडिलांचा दावा खरा आहे,
5) याप्रकरणी आता FIR दाखल होईल, एन्काऊंटर करणाऱ्या 5 पोलिसांवर खटला चालवा