MS Dhoni निवृत्त होणार, पण कधी? 'धोनी म्हणतोय पुढच्या वर्षी की पाच वर्षात माहीत नाही...'
abp majha web team | 21 Nov 2021 10:54 PM (IST)
चेन्नई सुपर किंग्जला चौथ्यांदा आयपीएलचं विजेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीनं शेवटचा सामना चेन्नईतच खेळण्याचा इरादा जाहीर केलाय. पण धोनी शेवटचा सामना कधी खेळणार याबाबत मात्र त्यानं सस्पेन्स कायम ठेवलाय. यावर्षी की पाच वर्षांनी हे माहीत नाही, असं सांगत त्यानं आणखी पाच वर्षे खेळण्याचे संकेत दिलेत. 40 वर्षीय धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आयपीएलमध्ये त्याचा करिष्मा कायम आहे. चेन्नईच्या आयपीएल विजेतेपदाच्या निमित्तानं शनिवारी तमिळनाडूत एका कार्यक्रमात जल्लोष करण्यात आला. त्यावेळी धोनीनं निवृत्तीबाबत भाष्य केलं.