Sambhaji Nagar Drought Special Report : शेततळी कोरडी, बागा करपल्या; मराठवाड्याचं वाळवंट कुणामुळे?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMarathwada Drought Updates: छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा दुष्काळानं (Marathwada Drought) पुरता होरपळून गेला आहे. अनेक गावांची आणि वाड्यांची तहान आता टँकरवर अवलंबून आहे. तर दुसरीकडे चारा नसल्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरं विकण्यासाठी बाजारांमध्ये गर्दी केली आहे. दुष्काळामुळे ही अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना अवकाळीनंही शेकडो हेक्टरवरील पिकांचा चिखल झाला आहे.
मराठवाड्यात पाणी या दोन अक्षरी शब्दाभोवती ग्रामीण असो वा शहरी जीवन फिरतंय. सध्या नळाला पाणी आणि गावा टँकर येण्याच्या आनंदाएवढी दुसरी कुठलीही गोष्ट कुठली नाही. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आणि शहरात पाण्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली जात आहे. आत्तापर्यंत आपण पाण्यासाठी दिवसा सुरू असलेली धडपड पाहिली असेल. 'एबीपी माझा'नं जवळपास अख्खा मराठवाडा संपूर्ण रात्र कशी पाण्यासाठी जागून काढतंय, याचा ग्राउंड रिपोर्ट केलाय. पाण्यासाठी दिवसा केली जाणारी वणवण आपण पाहिलीये, पण पाण्यासाठी रात्रीचा दिवस करून एक एक थेंब मिळवणं, हे दृश्य तितकंच भीषण आणि मन हेलावणारं होतं.