मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा? मराठी भाषा दिनाच्या मुहूर्तावर निर्णय होणार?
प्रशांत कदम, एबीपी माझा, दिल्ली | 22 Feb 2022 12:08 PM (IST)

मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे..गेल्या दशकभरापासून या निर्णयाची महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे. मराठी भाषा दिवस जवळ येत असतानाच राज्य सरकारनं पुन्हा या मुद्द्यावरुन केंद्रावर दबाव टाकण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.