OBC Morcha Nagpur : नागपुरात ओबीसींचा एल्गार, मराठा आरक्षणाला विरोध Special Report
abp majha web team | 10 Oct 2025 10:06 PM (IST)
मराठा (Maratha) आणि ओबीसी आरक्षणामुळे (OBC Reservation) तापलेल्या राजकारणात, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी नागपुरात (Nagpur) काढलेल्या मोर्चाने वादाची नवी ठिणगी टाकली आहे. 'विखे नावाचा माणूस हा महामूर्ख माणूस आहे', अशा शब्दात ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर हल्लाबोल केला. २ सप्टेंबरच्या मराठा आरक्षण जीआरविरोधात (GR) काढलेल्या या मोर्चात मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना थेट आव्हान देण्यात आले. मात्र, या मोर्चाकडे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांसारख्या प्रमुख ओबीसी नेत्यांनी पाठ फिरवल्याने ओबीसी नेतृत्वात मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन सरकार देत असून, मराठा आणि ओबीसी समाजांमध्ये समतोल साधण्याची मोठी कसरत सरकारला करावी लागणार आहे.