Malshej Ghat : माळशेज पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन, लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे पर्यटकांना नो एन्ट्री!
अभिजीत देशमुख एबीपी माझा Updated at: 13 Jun 2021 09:13 PM (IST)
कल्याण नगर रस्त्यावर असलेल्या माळशेज घाटाला नैसर्गिक वरदान लाभलंय. पावसाळ्यात आकाशाची स्पर्धा करणाऱ्या डोंगरावर पसरणारी धुक्याची चादर ,सर्वत्र पसरलेली हिरवळ, धबधबे यामुळे पर्यटकांची पाऊले आपसूकच या घाटाकडे वळतात. दोन वर्षापासून कोरोना काळात मात्र पर्यटकांचा हिरमोड झालाय. यंदा पुन्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने येथील पर्यटन स्थळांवर बंदी घातलीय. त्यामुळे या घाटातील बहुतांश पॉईंट निर्मनुष्य झालेत. गर्दी होणाऱ्या प्रत्येक पॉईंटवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.अभ