Malik VS Fadnavis युद्ध कोर्टाच्या दारात,निलोफर खानची फडणवीसांना नोटीस,तर अमृता फडणवीसांची मलिकांना
abp majha web team
Updated at:
11 Nov 2021 11:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmruta Fadnavis on Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय युद्ध आता कोर्टाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. आज, सकाळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांची कन्या निलोफर खान यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना अब्रूनुकसानीसंदर्भात नोटीस धाडली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेपार्ह वक्तव्य मागे घ्यावं अशी मागणी निलोफर खान यांनी केली आहे. तर नवाब मलिकांनी ४८ तासांत आक्षेपार्ह ट्विट मागे घेऊन माफी मागावी अशी मागणी अमृता फडणवीस यांनी केली आहे.