MNS Rada Panvel Special Report : Amit Thackeray यांच्यावर मारहाणीचा आरोप, मनसेच्या दोन गटात राडा
abp majha web team Updated at: 09 Jan 2024 10:10 PM (IST)
मुंबई: मनसे कार्यकर्ते (MNS) आणि माथाडी कामगार (Mathadi Kamgar Sanghatana) यांच्यात आज खारघरमधील मेडिकव्हर रुग्णालयाच्या बाहेर मोठा राडा झाला. यामध्ये माथाडी कामगार नेते महेश जाधव (Mahesh Jadhav) यांनी मनसेचे नेते आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरेंच्या (Amit Thackeray) कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला. त्यावर आता मनसेकडून प्रतिक्रिया आली. महेश जाधव यांनी अमित ठाकरेंचा अपमान केल्याने मनसेचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांना मारहाण केल्याचं संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी सांगितलं.