Mahayuti Ajit Pawar : टार्गेटवर दादा, महायुतीत वांदा? ; महायुतीत अजितदादा एकटे? Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकसभेतल्या अपयशानंतर विधानसभेसाठी महायुती कंबर कसून कामाला लागलीय... लाडकी बहीणसारख्या महत्त्वाकांंक्षी योजनांचा मोठा गाजावाजा करण्यात येतोय...पण एकीकडे हा धूमधडाका सुरू असताना भाजप आणि शिवसेनेतल्या नेत्यांमधून मात्र राष्ट्रवादीबद्दलची नाराजी उफाळून आलीय...त्यामुळे अजितदादा काय करणार हा प्रश्न विचारला जातोय, पाहुयात याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट...
आधी एकनाथ शिंदेंचे शिलेदार तानाजी सावंत...
आणि आता भाजपचे प्रवक्ते गणेश हाके...
दोघांच्याही रडारवर आहे अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस...
सत्तेत शिवसेना आणि भाजपनं राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसणं दोघांनाही पटलेलं नाहीय...
आणि राष्ट्रवादीबद्दलची ही मळमळ जाहीरपणे बोलून दाखवायला दोघेही कचरले नाहीत...
राष्ट्रवादीसोबत बसल्यावर उलटी होते, असं तानाजी सावंत म्हणत नाही तोवरच गणेश हाकेंनी राष्ट्रवादीशी युती असंगाशी संग म्हणत वाद निर्माण केलाय...
आणि खुद्द अजित पवारांनी यावर इशारेवजा उत्तर दिलंय...
एकीकडे भाजप, शिवसेनेच्या नेत्यांची टोकाची भाषा...दुसरीकडे महायुतीत राहूनही वैचारिक मतभेद... या कात्रीत सापडलेले दादा भविष्यात कोणती भूमिका घेतात, हे पाहावं लागेल... ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा...