Maharashtra Shahir vs The Kerala Story : द केरला स्टोरीच्या मोफत शोवर शिंदेंचा संताप Special Report
abp majha web team | 08 May 2023 10:58 PM (IST)

द केरला स्टोरी.. सध्या सोशल मीडियासह सगळीकडेच या चित्रपटाची चर्चा होतीय.. काही नेत्यांकडून या सिनेमाचे मोफत शो आयोजित केले जात आहेत... आणि हाच धागा पकडत विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला, तर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मोफत शोमुळे महाराष्ट्र शाहीर या मराठी सिनेमाला याचा फटका बसत असल्याचं ट्विट करत संताप व्यक्त केला.. त्यामुळे महाराष्ट्रात नव्या वादाचा चित्रपट पाहायला मिळण्याची चिन्ह आहेत.