Maharashtra Politics : महाराष्ट्राचा 'पप्पू' कोण? राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी Special Report
abp majha web team Updated at: 03 Nov 2025 10:06 PM (IST)
महाराष्ट्राच्या राजकारणात 'पप्पू' (Pappu) शब्दावरून नवा वाद पेटला असून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते आशिष शेलार यांचे अभिनंदन करत म्हटले की, 'मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे'. मतदार यादीतील (Voter List) घोळावर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची तुलना राहुल गांधींशी (Rahul Gandhi) करत 'महाराष्ट्राचा पप्पू' होऊ नये, असा टोला लगावला होता. यानंतर, आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत मतदार यादीतील त्रुटी मान्य केल्याने, उद्धव ठाकरे यांनी शेलारांनी फडणवीसांनाच 'पप्पू' ठरवल्याचा दावा केला आणि हा भाजपमधील अंतर्गत वादाचा परिणाम असू शकतो, असेही सूचित केले.