Ramdas Athawale on Prakash Ambedkar : आठवलेंची आंबेडकरांना साद, वंचितचा 'राजीनामा' प्रस्ताव Special Report
abp majha web team | 13 Oct 2025 10:26 PM (IST)
केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना महायुतीत सामील होण्याची खुली ऑफर दिली आहे. 'तुमच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि भाजपसोबतचे सर्व संबंध तोडा, तसेच तुमचा आठवले गट वंचित बहुजन आघाडीमध्ये विलीन करा,' अशा शब्दात वंचितच्या नेत्याने आठवलेंना प्रत्युत्तर दिले आहे. संभाजीनगर येथील एका सभेत बोलताना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आठवलेंनी आंबेडकरी ऐक्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. 'तुम्ही उघड्यावर राहू नका, तुमच्या नेतृत्वात काम करायला तयार आहे' असंही आठवले म्हणाले होते. यानंतर आठवलेंनी सोशल मीडियावर आंबेडकरांचा फोटो टॅग करत युतीचा प्रस्ताव ठेवला, पण वंचितने आठवलेंची भूमिका आणि भाजपसोबतची त्यांची युती यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. त्यामुळे आता या राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.