Pik Vima Yojana Special Report : राज्यात पीक विमा योजनेचा गौरफायदा घेण्याचा प्रयत्न,नेमकं काय घडतंय?
abp majha web team
Updated at:
22 Jul 2023 08:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App२०२२-२३ च्या फळ पिक विमा योजनेसाठी जवळपास २ लाख ४८ हजार ९३० अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र शेतात कोणतेही फळपीक नसताना शेतकऱ्यांच्या नावाने कोणीतरी दुसऱ्याच व्यक्तींनी विमा भरल्याचं आता उघड झालाय. एवढंच नाही तर राज्यभरात तब्बल १४ हजार ५९३ बोगस अर्ज दाखल झाल्याचे फळ पीक विमेच्या क्षेत्रीय तपासणीत समोर आलंय. त्यापोटी ६५ कोटी ३६ लाख रुपयाचा विमा हफ्ता देखील शेतकऱ्यांच्या नावाने भरण्यात आला होता. ही संपूर्ण रक्कम आता शासनाने जप्त केलीय. एकट्या सोलापूर जिल्ह्यात ४ हजार ४१३ पैकी २ हजार ७१३ अर्ज बोगस असल्याचे समोर आलंय. तर जालन्यात ४७ हजार ६८७ अर्ज बोगस असल्याचे पडताळणीत समोर आलं आहे. हे केवळ फळ पीक संदर्भात आहे. आणि यातून १९३ कोटींचा विमा लाटण्याचा प्रयत्न झालाय.