Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडे

Continues below advertisement

Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडे

ही बातमी पण वाचा

गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला

Nitin Deshmukh : आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असते तर धनंजय मुंडे यांना घरातूनच नव्हे तर जिल्ह्यातून लाथ मारुन हाकलून लावलं असतं, असं वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केलं आहे. अकोल्यातल्या जन आक्रोश मोर्चात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख हे देखील सहभागी झाले होते. यावेळी बोलताना देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. 

धनंजय मुंडे मंत्रीपदावर राहिले तर त्याचा फायदा वाल्मिक कराडला होईल. त्यामुळं मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी, मागणीही देशमुख यांनी केली आहे. दरम्यान, वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा मित्र आणि धनंजय मुंडे यांचे मित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र संशयाच्या भवऱ्यात आहे. महाभारतातील कर्णाप्रमाणानेच धनंजय मुंडे त्याच्या मित्राला साथ देतील, अशी शंका देखील नितीन देशमुख यांनी व्यक्त केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राजकीय नेते ऐकमेतकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तसेत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील विरोधक करत आहेत.

संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलच गरम 

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलच गरम झालं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हेच या हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळं या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी मंतच्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असी देखील मागणी केली जात आहे. धनंजय मुंडे यांनी रविवारी राष्ट्रवादीच्या शिबिरात वाल्मिक कराड याच्यासोबत आर्थिक हितसंबंध असल्याचा दावा फेटाळून लावला होता. या सर्व बातम्या खोट्या असल्याचे मुंडे यांनी म्हटले होते. मात्र, प्रकाश सोळंके यांनी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्यामुळेच मोठा झाल्याचे म्हटले. धनंजय मुंडे यांच्याकडे सातत्याने बीडचे पालकमंत्रिपद असल्यानेच जिल्ह्याची वाट लागली. वाल्मिकला कोणी पोसले? तो कोणाचा माणूस आहे? धनंजय मुंडे यांच्यामुळे तो मोठा झाला, असे प्रकाश सोळंके यांनी म्हटले.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram