Maharashtra : Beauty Parlours , Gym बाबत नवे आदेश, 50% क्षमतेनं आस्थापनं सुरू ठेवण्याची मुभा
abp majha web team
Updated at:
09 Jan 2022 11:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : सलूनबरोबरच ब्युटी पार्लरचा व्यवसाय देखील सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील ब्युटी पार्लर व स्पा व्यवसायिकांनी केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्रातील ब्युटी पार्लर व स्पा व्यवसायिकांची दुपारी 1 वाजता ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ब्युटी पार्लर व्यवसायास परवानगी दिली नसल्याने व्यावसायिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे याबाबत बैठक आयोजित केल्याची माहिती महाराष्ट्र सलून & ब्युटी पार्लर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी दिली आहे.